वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

हरिकथा करी म्हणोनि ह

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076004 · अभंग क्र. २७०

270.
हरिकथा करी म्हणोनि हरिदास ।
संतवृत्ति त्यास संत म्हणती ॥१॥
क्रियेपाशी नाम आपण ठसावे ।
नलगे सांगावे सकळ लोका ॥२॥
सोन्याचे घडणार सोनार त्या म्हणती ।
वैद्य तो म्हणती वैद्यकाने ॥३॥
बहेणि म्हणे तैसे ब्रह्म जेथे नांदे ।
ब्राह्मण तो वेदे प्रतिष्ठिला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग