वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

त्रिपुटी उलटु निंर्ग

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074750 · अभंग क्र. २७५

275.
त्रिपुटी उलटु निंर्गुणी अरूता ।
पाहाता दृष्टांता भेदु नाही ॥
भेदु अभेदु अवघाचि गोविंदु ।
बिंबे बिंब छंदु हरिलीला ॥
नाही आला गेला शब्द पै दृष्टांते ।
दृश्यादृश्य भूते एकतत्त्वी ॥
बापरखुमादेविवरू अधऊर्ध्व शेज ।
वेगी तू उमज अरे रया ॥

अर्थ :
निर्गुणाच्या अलिकडे असलेली जी त्रिपुटी तिचा विचाराने निरास करून निर्गुणाचे स्वरूप जाणले असता त्याठिकाणी भेदच राहात नाही. मग त्याला प्रमाण काय देणार. परंतु श्रीहरिची काही अशी विचित्र लीला आहे की तो देव व भक्त या रुपाने आपणच सर्व बनला आहे. तो परमात्मा भक्त झाला तरी केव्हाही जीवरूपाला आला नाही. व गेला नाही. त्याच्या संबंधी वेदवाक्यहाची तसेच आहे. त्याला दृष्टांतही देता येत नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलावाचून दुसरे काहीच नाही तसे त्यांना समजून घे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग