वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

शमदम सर्व साधिले नवग

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076010 · अभंग क्र. २७८

278.
शमदम सर्व साधिले नवगुण ।
संतोषे संपन्न सर्वदा जो ॥१॥
ब्राह्मण वरिष्ठ श्रेष्ठाचाहि श्रेष्ठ ।
जयाचेनि भ्रष्ट मोक्ष पावे ॥२॥
तृष्णा मोह दंभ गेला अहंकार ।
वृत्ति निर्विकार सर्व कर्मी ॥३॥
बहेणि म्हणे ज्याची निरसली वासना ।
ब्राह्मण तो जाणा ब्रह्मनिष्ठ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग