षडूस पक्कान्न भोजनी
270.
षडूस पक्कान्न भोजनी बैसता । मक्षिके तत्त्वता घात केला ॥१॥
जातीचा स्वभाव अमंगळ आहे । कवणे तेथे लाहे भिन्न भिन्न ॥२॥
श्रानाचा स्वभाव बैसतांहि गादी । नरकादि शुध्दि पाहो धांवे ॥३॥
आपुले पारखे न कळेचि तया । भुंके भलतिया स्वभावेंचि ॥४॥
चोखा म्हणे तैसे दुर्जनाचे जिणे । सदा लाजिरवाणे जनांमध्ये ॥५॥
