सांवळा श्रीकृष्ण राख
273.
सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई । वेधियलें मन आमुचे ते पायी ॥१॥
नवल लाघव न कळे ब्रह्मादिका । वेदश्रुतीं शिणल्या ठक पडले सकळिका ॥२॥
साही दरुशने वेडावलीं जयासाठी । खांदी घेऊनी कांबळा गोधन राखी जगजेठी ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्मा गोकुळी उघडें । पाहता चित्त तेथे वेधले ॥४॥
