रावणा मारून माझ्या म
272.
रावणा मारून माझ्या माये गे | बिभीषण लंकेस स्थापिलास काय गे |अयोध्येस आलीस काय गे | माझे हृदयमंदिरी राहे गे | विठ्ठल माये गे ॥१॥
रुसुनी आली रखुमाबाई गे | तिच्या मागे तू धावलीस काय गे |संगे घेऊनिया गोपाळ गाय गे | मम हृदयमंदिरी राहे गे ॥२॥
सत्त्ये राधिकेचे पायी गे | सोडूनी द्वारकेचा ठाव गे |आलीस काय गे | माझे हृदयमंदिरी राहे गे ॥३॥
धन्य पुंडलिक भक्त माय गे | त्याने विटेवर उभा केला काय गे |नामा म्हणे माझे माय गे | माझे हृदयमंदिरी राहे गे ॥४॥
