वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

एकाचा निश्चय गुरूवचन

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076088 · अभंग क्र. २७८

278.
एकाचा निश्चय गुरूवचनी मुक्ति ।
एक ते मांडिती निर्गुणध्यान ॥१॥
परि आहे मोक्ष वेगळाचि जण ।
ज्ञानी ते निर्वाण साधिती हो ॥२॥
सगुणचि मोक्ष एकाचिया मते ।
आकाररहित मोक्ष म्हणती ॥३॥
एक ते भाविती मोक्ष भक्ति ज्ञान ।
वैराग्य साधन म्हणती मोक्ष ॥४॥
एक ते सिद्धीते म्हणताती मोक्ष ।
शास्त्रज्ञाते मोक्ष म्हणती एक ॥५॥
एक ते स्वाचारे मोक्ष प्रतिहिती ।
फलत्यागे भाविती एक मोक्ष ॥६॥
मनोजय एक कल्पिताती मोक्ष ।
ध्यानाचिय पक्षे मुक्ति म्हणती ॥७॥
एक महत्तत्व विचारे स्थापिती ।
मद्यमांस घेती मोक्षहेतु ॥८॥
एक ते इंद्रिये आचरती यथेष्ट ।
तोचि मोक्ष, भ्रष्ट मानिताती ॥९॥
एक ते वेदाचे पठणे म्हणती ।
मोक्ष एक भाविती प्रपंचाते ॥१०॥
एक क्लेशे जाणा दंडिती देहासी ।
म्हणती मोक्षासी हेतु हाचि ॥११॥
एक ते पंचाग्नि धूम्रपान वनी ।
मोक्ष हाचि जनी भाविताती ॥१२॥
एक ते संन्यासी जटिल तापसी ।
मोक्ष हा तयासी स्थापिती ते ॥१३॥
एक पंचीकरणे पहाती सर्वदा ।
म्हणती मोक्षपदा हेचि मूळ ॥१४॥
एक मौनी जपी तपी अनुष्ठानी ।
भाविती ते जनी येणे मोक्ष ॥१५॥
एक पंचमुद्रा लाविती आपणा ।
म्हणती मोक्ष जाणा येणे होय ॥१६॥
एक ते दैवते ध्याती नानापरी ।
मोक्ष हा अंतरी मानिताती ॥१७॥
बहेणि म्हणे मोक्ष आहे तो वेगळा ।
जाणती ते कळा ज्ञानवंत ॥१८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग