सुख पाहावया नाना उपा
272.
सुख पाहावया नाना उपाय । अवघेंचि होय दुःखमय ॥१॥
ऐसी हे चाली उफराटी देखिली । वाउगी ती बोली श्रम वाया ॥२॥
दोराचा सर्प भासतसे साचा । तैसा हा देहाचा परिणाम ॥३॥
चोखा म्हणे याचे मानिताती कोड । कैसे हे दगड जन्मा आले ॥४॥