म्हैस वेलि देता सेलि
269.
म्हैस वेलि देता सेलि होंसि कासाविस ।
येईल पुढे थेटे पडसे आयुष्याचा नाश ॥१॥
बुड हरि सवे । देहभाव उरनिभावे ॥२॥
दरडिवरी राहोनि उभा मारिसी किराणे ।
तळींचा धोंडा नेणोनि पोरा जाशील जिवे प्राणे ॥३॥
म्हणे निळा सांडूनि खेळा श्रीहरीते भज ।
आक्षोम जळ न चले बळ होशील निर्बुज ॥४॥
