जाणते नेणते होतु ब्र
276.
जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची ॥१॥
सुलभ सोपारे गोकुळामाझारीं । घरोघरी चोरी खाय लोणी ॥२॥
न कळे ब्रह्मादिका करिता लाघव । योगियांची धांव खुटें जेथे ॥३॥
एका जनार्दनी चेंडुवाचे मिसे । उडी घालितसे डोहामाजीं ॥४॥
