कलियुगामाजीं थोर जाल
2580.
कलियुगामाजीं थोर जाले पाषांड । पोटासाठीं संत जाले उदंड ॥१॥ नाही विश्वास संतदया मानसी । बोलती वायांविण सौरस अवघा उपहासी ॥२॥ वेद पठण शास्त्रें संभाषे पुराणमत । अवघे बोधोनि ठेविती बोलती वाचाळ मत्त ॥३॥ देव भजन संतपुजन तीर्थ महिमान न कळे मुढ । ऐसे कलियुगीं जाले जाणत जाणत दगडा ॥४॥ एका जनार्दनी काया वाचा राम जपा । सोपे हे साधन तेणे नोहे पुण्यपापा ॥५॥
