स्थूल देह - अभंग
2567.
स्थूल देह - अभंग
स्थूल देहाचा विचार । हाता आलिया साचार । तेथे देहे अहंकार । विरोनि जाये ॥१॥
स्थूल ब्रह्माज्ञान नेत्री । स्थूलभोग जागृति वैखरी । हे नव्हे मी ऐसा अंतरी । बोध झाला ॥२॥ मग देहे मारिता तोडितां । पूजितां का गाजिता । नसे हर्षे खेदवार्ता । तया पुरुषा ॥३॥
एका जनार्दनी । लीन झाला संतचरणी । दर्पणामाजीं बिंबोनि । दर्पणातीत ॥४॥
