आर्त माझ्या बहु पोटी
2577.
आर्त माझ्या बहु पोटी । व्हावी भेटी पायाची ॥१॥
यासी तुम्ही कृपावंता । माझी चिंता असो द्या ॥धृपद॥
तळमळ करी चित्त । अखंडित योगे ॥२॥
तुका म्हणे पढंरिनाथा । जाणे व्यथा अंतरिची ॥३॥
अर्थ :
हे पंढरीनाथा तुझ्या पायाची भेट व्हावी हीच तीव्र इच्छा माझ्या पोटी आहे. हे कृपावंता देवा माझी इच्छा आहे त्याविषयी तुम्ही कृपा असो द्यावी. देवा माझे चित्त तुझ्या वियोगामध्ये अखंडित तळमळत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा माझ्या अंतरीची व्यथा तुम्ही जाणून घ्यावे.
