वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 81. नवविधा भक्ति - अभंग २५७१ ते २५७२

नवविधा भक्ति - अभंग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084763 · अभंग क्र. २५७१

2571.
नवविधा भक्ति - अभंग

नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगु आता ॥१॥ एक एक नाम घेता प्रातःकाळी । पापा होय होळी क्षणमात्रें ॥२॥ श्रवणें परीक्षिती तरला भूपति । सात दिवसां मुक्ति जाली तया ॥३॥ महाभागवत श्रवण करुनी । सर्वागाचें काम केले तेणे ॥४॥ श्रीशुक आपण करूनी कीर्तन । उद्धरिला जाण परिक्षिती ॥५॥ हरिनाम घोषें गर्जें तो प्रल्हाद । स्वानंदे प्रबोध जाला त्यासी ॥६॥ स्तंभी अवतार हरि प्रगटला । दैत्य विदारिला तयालागीं ॥७॥ पायाचा महिमा स्वये जाणे रमा । प्रिय प्ररुषोत्तमा । जाली तेणे ॥८॥ हरि पदांबुज सुकुमार कोवळे । तेथे करकमळे अखंडित ॥९॥ गाईचिया मागे श्रीकृष्ण पाउले । अक्रुरें घातले दंडवत ॥१०॥ करुनी वंदन घाली लोटांगण । स्वानंदे निमग्न जाला तेणे ॥११॥ दास्यत्व मारुती अचें देहास्थिती । सीताशुद्धि कीर्ति केले तेणे ॥१२॥ सेव्य सेवक भाव जाणे तो मारुती । स्वामी सीतापती संतोषला ॥१३॥ सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति । सर्वभावे प्रीति अर्जुनासी ॥१४॥ उपदेशिली गीता सुखी केले पार्थां । जन्ममरण वार्ता खुंटविली ॥१५॥ आत्मानिवेदन करूनियां बळीं । जाला वनमाळी द्वारपाळ ॥१६॥ औट पाऊल भूमी घेऊनी दान । याचक आपण स्वये जाला ॥१७॥ नवविधाभक्ति नवजणें केली । पूर्ण प्राप्ती जाली तयालागीं ॥१८॥ एका जनार्दनी आत्मनिवेदन । भक्ति दुजेंपण उरले नाही ॥१९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग