वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आणीक म्या कोणा यावे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077366 · अभंग क्र. २५७५

2575.
आणीक म्या कोणा यावे काकुळती । कोण कामा येती अंतकाळी ॥१॥
तू वो माझी सखी येसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहे ॥धृपद॥
काया वाचा मने हेचि आस करी । पाउले गोजिरी चिंतीतसे ॥२॥
तुका म्हणे माझी पुरवी हे आस । घाली ब्रम्हरस भोजन हे ॥३॥

अर्थ :
हे देवा आता तुझ्याशिवाय मी कोणास काकुळतीस येऊ, कोणास शरण जाऊ कारण अंतकाळात माझ्या मदतीला तुझ्याखेरीज कोण धावून येईल, माझ्या शेवटच्या क्षणी माझी कोण सोडवणूक करेल? हे पांडुरंगा तू माझी सखी आहेस, माझी जिवाभावाची मैत्रीण आहेस, तू लवकर माझ्या हाकेला धावून ये, मी तुझी वाट पाहत आहे. माझे मन काया वाचा सकट तुझ्या पाउलांची आस लावून बसले आहेत, तुझ्या गोजिऱ्या पायाचे सतत ते चिंतन करत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा, हे विठ्ठला कृपा करून माझी ही आस, माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करावीत व माझ्या मुखी ब्रम्‍हरस रुपी भोजन घालून मला धन्य करावेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग