वेषधार्याच्या भावना
2584.
वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८
कलिमाजीं दैवते उघड दिसती फार । नारळ आणि शेंदुर यांचा भडिमार ॥१॥ लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचें धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥ तेल रांधा मागती मलीदा वरती काजळ कुंकूं । फजीतखोर ऐसे देव तयाचे तोडावर थुंकु ॥३॥ एका जनार्दनी सर्वभावे सोपा पंढरीराव । तया सांडोनी कोण पुसे या देवाची कायसी माव ॥४॥
