मी तव बैसलो धरुनिया
2601.
मी तव बैसलो धरुनिया आस । न करी उदास पांडुरंगा ॥१॥
नको आता मज दवडू श्रीहरी । मागाया भिकारी जालो दास ॥धृपद॥
भुकेलो कृपेच्या वचनाकारणे । आशा नारायणे पुरवावी ॥२॥
तुका म्हणे येऊनिया देई भेटी । कुरवाळुनी पोटी धरी मज ॥३॥
अर्थ :
हे पांडुरंगा मी तुझ्या भेटीची आस धरुन तुझ्या दारात बसलो आहे त्यामुळे तू मला उदास करु नकोस. हे श्रीहरी मी भिकारी होऊन तुझ्या दारात भीक मागत आहे तुझा दास झालो आहे त्यामुळे तू मला दवडवू नकोस. हे नारायणा मी तुझ्या कृपावचनेचा भुकेला झालो आहे आणि तुझे कृपावचन ऐकण्यासाठी मी भुकेला झालो असून एवढीच एक आशा माझी तुम्ही पुरवावी. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा तुम्ही आता मला येऊन भेट दयावी आणि मला कुरवाळून तुमच्या पोटाशी धरा.
