कोण मानील हा नामाचा
2582.
कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावे ॥१॥ कलियुगामाजीं अभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥ नानापरीचीं मतें नसती दाविती । नानामंत्र जपती अविधीनें ॥३॥ एका जनार्दनी पातकाची राशी । नाम अहर्निशी न जपती ॥४॥