वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 83. कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३

पंडित शास्त्री होती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085218 · अभंग क्र. २५७८

2578.
पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१॥ स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥ नीचाचें सेवक करती घरोघरी । श्वानाचिये परी पोट भरती ॥३॥ एका जनार्दनी आपुलीं स्वधर्म । सांडुनियां वर्म होती मुढ ॥४॥
२५७९
या पोटाकारणें न करावे ते करिती । वेद ते विकिती थोर याती ॥१॥ नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण । ऐकती ब्रह्माज्ञान त्यांचे मुखें ॥२॥ श्रेष्ठवर्ण होउनी नीचकर्म करिती । कांही न ते भीती पुण्यपापा ॥३॥ एका जनार्दनी सांडोनि आचार । करिती पामर नानामतें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग