वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

चाल घरा उभा राहे नार

🙏 3. संत तुकाराम · ABH-077360 · अभंग क्र. २६०८

2608.
चाल घरा उभा राहे नारायणा । ठेवू दे चरणांवरी माथा ॥१॥
वेळोवेळा देई क्षेमआलिंगन । करी अवलोकन कृपादृष्टी ॥धृपद॥
प्रक्षाळू दे पाय बैसे माजघरी । चित्त स्थिर करी पांडुरंगा ॥२॥
आहे त्या संचिते करवीन भोजन । काय न जेवून करिसी आता ॥३॥
करुणाकरे नाही कळो दिले वर्म । दुरी होता भ्रम कोण वारी ॥४॥
तुका म्हणे आता आवडीच्या सत्ता । बोलिलो अनंता करवीन ते ॥५॥

अर्थ :
हे नारायणा माझ्या घरामध्ये चाल तेथे तू उभा राहा मला तुझ्या चरणावर माथा ठेवू दयावे. देवा तू वेळोवेळी मला प्रेमाने आलिंगन देत राहा आणि कृपादृष्टी माझ्यावर सतत ठेवत राहा. हे पाडूरंगा तू मला तुझे पाय धुवू दे नंतर माझ्या घराच्या माजघरामध्ये बैस आणि माझे चित्त स्थिर कर. देवा माझ्या संचितानुसार जेवढे काही भोजन माझ्या घरी आहे तेच भोजन मी तुला जेवू घालीन आता माझ्या घरी तू आला आहेस तर न जेवून तू आता काय करशील ? हे करुणाकरा तू जर नीजस्वरूपाचे खरे वर्म कळू दिले नाही सांगितले नाही आणि माझ्यापासून दूर निघून गेलास तर माझ्या भ्रमाचे निवारण कोण करील ? तुकाराम महाराज म्हणतात, हे अनंता मी तुझ्याशी आता प्रेमसत्तेने बोलत आहे परंतू मी जे काही बोलत आहे ते तुझ्याकडून करवूनच घेईन.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग