वंदुं अभाविक जन । ऐक
2583.
वंदुं अभाविक जन । ऐकावेंक साधन पावन । कलियुगीं अज्ञान । अभाविक पै होती ॥१॥
न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र । ज्ञान ध्यान गायत्री मंत्र । जप तप राहिले ॥२॥ यज्ञ यागादिक दान । कोणा न कळे महिमान । अवघे जाहले अज्ञान । न कळे कांही ॥३॥ लोपले मंत्र औषध । गाईस न निघे दुग्ध । पतिव्रता ज्या शुद्ध । व्यभिचार करिती ॥४॥ ऐसियानें करावे काय । तिही ध्यावें विठ्ठल पाय । एका जनार्दनी ध्याय । विठ्ठल नाम आवडी ॥५॥
