वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

स्मरणाचे वेळे । व्हा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077343 · अभंग क्र. २५७१

2571.
स्मरणाचे वेळे । व्हावे सावध न कळे ॥१॥
पडिलो विषयांचे ओढी । कोणी न दिसेसे काढी ॥धृपद॥
भांडवल माझे । वेच झाले भूमी ओझे ॥२॥
तुका म्हणे कळे । तूचि धावे ऐसे वेळे ॥३॥

अर्थ :
हरी चिंतन करताना किंवा स्मरण करताना सावध व्हावे हे मला कळत नाही. मी विषय आवडीच्या प्रवाहामध्ये पडलो आहे या मधून मला बाहेर कोणी काढेल असे मला दिसत नाही. माझे मुख्य भांडवल म्हणजे मन होते बुद्धी होती आणि आता त्या बुद्धीचा उपयोग नको त्या ठिकाणी मी केला तेथे माझा या भांडवलाचा खर्च झाला त्यामुळे मी आता भूमीला ओझे म्हणून राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तूच एक अशा वेळी धावून येणार आहेस हे मला कळले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग