वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

स्वयंप्रकाशामाजीं के

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086168 · अभंग क्र. २५६५

2565.
स्वयंप्रकाशामाजीं केले असे स्नान । द्वैतार्थ त्यागुन निर्मळ जाहलों ॥१॥
सुविद्येचें वस्त्र गुंडोनि बैसलो । भूतदया ल्यालों विभूती अंगी ॥२॥
चोविसापरतें एक वोळखिलें । तेचि उच्चारिले मुळारंभीं ॥३॥
आकार हारपला उकार विसरला । मकरातीत केला प्रणव तो ॥४॥
अहं कर्म सर्व सांडियेल्या चेष्टा । तोचि अपोहिष्ठा केले कर्म ॥५॥
संसाराची तीन वोंजळीं घातले पाणी । आत्मत्वालागुनी अर्घ्य दिले ॥६॥
सोहं तो गायत्री जप तो अखंड । बुद्धिज्ञान प्रचंड सर्वकाळ ॥७॥
एका भावे नमन भूतां एकपणी । एका जनार्दनी संध्या जाहली ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग