कलीमाजी नोहे अनुष्ठा
2576.
कलीमाजी नोहे अनुष्ठान । कालीमाजीं नोहे हवन । कालीमाजीं नोहे पठण । नोहे साधन मंत्राचें ॥१॥ नोहे योगयागाविधी । नसती अंगी ते उपाधी । वाढतसे भेदबुद्धी । नोहे सिद्धि कोणती ॥२॥ न चले कर्माचें आचरण । विधिनिषेधांचे महिमान । लोपली तीर्थे जाण । देवप्रतिमा पाषाण ॥३॥ न ठाके कोणाचा कोठे भाव । अवघा लटिका वेवसाव । एका जनार्दनी भेव । जेथे तेथे वसतसे ॥४॥
