वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 84. वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८

म्हणती देव मोठे मोठे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084564 · अभंग क्र. २५९२

2592.
म्हणती देव मोठे मोठे । पूजिताती दगडगोटे ॥१॥
कषाट नेणती भोगिती । वहा दगडातें म्हणती ॥२॥
जीत जीवा करुनि वध । दगडा दाविती नैवेद्य ॥३॥
रांदापोरें मेळ जाला । एक म्हणतो देव आला ॥४॥
नाक घासुनी गव्हार । देवा म्हणती गुन्हेगार ॥५॥
एका जनार्दनी म्हणे । जन भुललें मुर्खपणें ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग