वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

कासया वाचूनि झालो भू

🙏 3. संत तुकाराम · ABH-077110 · अभंग क्र. २६०६

2606.
कासया वाचूनि झालो भूमी भार । तुझ्या पायी थार नाही तरी ॥१॥
जाता भले काय डोळियांचे काम । जव पुरुषोत्तम न देखती ॥धृपद॥
काय मुख पेव श्वापदाचे धाव । नित्य तुझे नांव नुच्चारिता ॥२॥
तुका म्हणे आता पांडुरंगाविण । न वांचता क्षण जीव भला ॥३॥

अर्थ :
देवा मला तुझ्या पायाच्या ठिकाणी थाराच नाही तर मग मी कशासाठी भूमीला भार झालो आहे ? माझ्या डोळयांनी जर पुरुषोत्त्माला पाहीलेच तर मग त्यांचे काय काम आहे ते नसलेले बरे. देवा तुझे नांव जर नित्य स्वरुपात माझ्या मुखाने उच्चारले नाही तर ते केवळ धान्य ठेवण्याचे एक पेव आहे किंवा श्वापदे राहाण्याची गुहाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पाडूरंगावाचून एक क्षणभर देखील जीव नाही राहीला तरच चांगले होईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग