फजितीचे देव मागती घु
2591.
फजितीचे देव मागती घुटीरोटी । आपणासाठीं जगा पीडितो काळतोंडें मोठीं ॥१॥
नको तया देवा आठवा मजसी । विठ्ठल मानसी आम्ही ध्याऊं ॥२॥
अविचारी देव अविचारी भक्त । देवाकारणे मारिती पशुघात ॥३॥
एका जनार्दनी जळो जळो ऐसा देव तो भांड । विठ्ठल विठ्ठल न म्हणे त्याचे काळे तोंड ॥४॥
