म्हणऊनि धरिले पाय ।
2583.
म्हणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥१॥
आपुलेंचि करूनि घ्यावे । आश्वासावे नाभिसे ॥धृपद॥
वाढली ते तळमळ चित्ता । शम आता करावी ॥२॥
तुका म्हणे जीवी वसे । मज नसे वेगळा ॥३॥
अर्थ :
हे माय विठ्ठले मला संसाराची खूप भीती वाटली म्हणूनच मी तुझे पाय धरले आहेत. तु मला आपलेसे करून घ्यावे आणि भिऊ नकोस असे आश्वासन तु मला द्यावे. माझ्या चित्तामध्ये फार तळमळ वाढली आहे त्याचे आता तु शमण कर. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठले तु माझ्या जिवामध्येच रहा वस्ती कर माझ्यापेक्षा वेगळे राहू नकोस.
