न करावी चिंता । भय ध
2611.
न करावी चिंता । भय धरावे सर्वथा ॥१॥
दासा साहे नारायण । होय रक्षिता आपण ॥धृपद॥
न लगे परिहार । काही योजावे उत्तर ॥२॥
न धरावी शंका । नये बोलो म्हणे तुका ॥३॥
अर्थ :
हरीच्या दासांनी कोणत्याही प्रकारची चिंता करु नये व कोणतेही भय मनात धरु नये. कारण नारायण त्याच्या दासांना नेहमी साहाय्य करतो व स्वत: त्यांचे रक्षण करण्यास तयार असतो. हरीजवळ कोणत्याही प्रकारचा परीहार देऊ नये आणि काही माहिती देण्यासाठी शब्दांची योजना देखील करु नये. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही प्रकारची शंका तुम्ही धरु नका आणि काहीही बोलू नका.
