महाकारण देह - अभंग
2570.
महाकारण देह - अभंग
महाकारण जे देहज्ञान । त्याचाही साक्षी आत्मा आपण । जैसा सेजे ये आंबा मुरोन । तैसा तो जाण ॥१॥ ऐशीं मुराली तुर्या अवस्था । मग साक्षी जाला परौता । तो मुरोनि वस्तुता । वस्तु जाला ॥२॥ ऐशी विवेकाची राबणूक । विवेक आत्मा वोळख । एका जनार्दनी परम सुख । प्राप्त जाले ॥३॥
