देही असोनिया देव । व
2606.
देही असोनिया देव । वाउगा करिती संदेहो ॥१॥
जाय देवळासी स्वये । मनी आशा दुसरी वाहे ॥२॥
बैसोनीं कीर्तनी । लक्ष लावी सदां धनीं ॥३॥
करु जाय तीर्थयात्रा । गोविलें मन विचारा ॥४॥
ऐशियासी न भेटे देव । एका जनार्दनी नाही भाव ॥५॥