नको मज ताठा नको अभिम
2607.
नको मज ताठा नको अभिमान । तुजवीण क्षीण होतो जीवा ॥१॥
दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवी मज ॥२॥
तुका म्हणे तुझे झालिया दर्शन । मग निवारण होईल सर्व ॥३॥
अर्थ :
देवा मला संपत्तीचा किंवा माझ्या देहाच्या सत्तेचा अभिमान नको कारण माझा जीव तुझ्यावाचून क्षीण होत आहे. हे वैकुंठनायका माया फार दुर्धर म्हणजे कठीण आहे अवघड आहे हिच्यातून सुटका होणे मला शक्य होत नाही त्यामुळे तूच मला यातून सोडव. तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकदा की मला तुझे नीजस्वरुपाचे दर्शन झाले की सर्व माया, दु:खाचे निवारण होईल.
