वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 82. सार - अभंग २५७३

सार - अभंग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087446 · अभंग क्र. २५७३

2573.
सार - अभंग

वेदामाजी ओंकार सार । शास्त्रासार वेदान्त ॥१॥ मंत्रामाजीं गायत्री सार । तीर्थ सार गुरुचरणी ॥२॥ ज्ञान सार ध्यान सार । नाम सार सर्वांमाजीं ॥३॥ व्रतामाजी एकादशीं सार । द्वादशी सार साधनी ॥४॥ पूजेमाजीं ब्रह्माण सार । सत्य सार तपामाजीं ॥५॥ दानामाजीं अन्नदान सार । कीर्तन सार कलियुगी ॥६॥ जनामाजीं संत भजन सार । विद्या सार विनीतता ॥७॥ जिव्हा उपस्थ जय सार । भोग सार शांतिसुख ॥८॥ सुखामाजीं ब्रह्मासुखसार । दुःख सार देहबुद्धी ॥९॥ एका जनार्दनी एका सार । सर्व सार आत्मज्ञान ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग