वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 81. नवविधा भक्ति - अभंग २५७१ ते २५७२

हरिकथा श्रवण परिक्षि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090324 · अभंग क्र. २५७२

2572.
हरिकथा श्रवण परिक्षिती सुजाण ऐकता आपण अंगें होय । होय न होय ऐसा संशय नाही पुर्वत्व राहे । राहिले गेले देह ज्याचा तो नेणे देहींचे विदेही होय । श्रवण समाधी नीचनवा आनंद ब्रह्माहस्मि न साहे रया ॥१॥ नवविधा भक्ति नवविधा व्यक्ति अवघिया एकची प्राप्ती । एका जनार्दनी अखंडता मुक्तीची फिटे भ्रांति रया ॥धृ.॥ हरीच्या कीर्तने शुक आणि नारद छेदिती अभिमानाचा कंदु । गाता पै नाचतां अखंड पै उल्हास कीर्तनी प्रेमाल्हादु । हरिनाम गजर स्वानंदे हंबरें जिंतिला पायेचा बाधू । श्रोता वक्ता स्वये सुखरुप जाला वोसंडला ब्रह्मानंदु रया ॥२॥ हरीचेनि स्मरणे द्वंद्व दुःख नाही हे भक्ति प्रल्हादा ठायी । कृतांत कोपलिया रोमही वक्र नोहे मनी निर्भयता निज देही । अग्नि विष आप नेदी त्या संताप न तुटे शस्त्राचे घाई । स्मरणाचेनि बळे परिपुर्ण जाला देह विदेह दोन्ही नाही रया ॥३॥ हरिचरणामृत गोड मायेसी उठी चाड लाहे जाली रमा । चरणद्वय भजता मुकलीं द्वंद्वभावा म्हणोनि पढिये पुरुषोत्तमा । हरिपदा लागली शिळा उद्धरली अगाध चरणमहिमा । चरणी विनटोनी हरिपदा पावली परि चरण न सोडी रया ॥४॥ शिव शिव यजिजे हे वेदांचे वचन पृथुराया बाणले पूर्ण । पूज्यपुज्यक भाव सांडोनी सद्भावें करी पुजन । देवी देव दाटला भक्त सांडोनी सद्भावें करी पुजन । देवी देव दाटला भक्त प्रेमे आटला मुख्य हे पूजेचे विधान । त्रिगुण त्रिपुटीं छेदुनियां पूजेमाजीं समाधान रया ॥५॥ हरिचरण रज रेणु वंदूनिया पावना जाला अक्रुर । पावनपणें प्रेमे वोसंडें तेणे वंदी श्वानसुकर । वृक्ष वल्ली तृणा घाली लोटांगण सद्भावें पूजी गौखुर । दंडाचिये परी लोटांगण घाली हरिस्वरुप चराचर रया ॥६॥ जीव जावो जिणें परि वचन नुलंघणें सेवेची मुख्य हा हेतु । या सेवा विनटोनि सर्वस्वें भजोनि दास्य उद्भट हनुमंतु । शास्त्रचेनि बळे न तुटे न बुडे न जलें देही असोनि देहातीतु । जन्ममरण होळी कासे भासें बळी भजनें मुक्त कपिनाथु रया ॥७॥ सख्यत्वें परपार पावला अर्जुन त्यासी न पुसत दे ब्रह्माज्ञान । स्वर्गाची खणखण बाणाची सणसण उपदेशा तेंचि स्थान । युद्धाचिये संधी लाविली समाधी कल्पातीं न मोडें जाण । निज सख्य दोघा आलिंगन पडिले भिन्नपणें अभिन्न रया ॥८॥ बळीची दानदीक्षा कैसी जीवे देउनी सर्वस्वेंसी निजबळे बाधीं देवासी । अनंत अपरंपार त्रिविक्रम सधर आकळिला हृषीकेशी । हृदयींचा हृदयस्थ आकळितां तंव देवची होय सर्वस्वेंसी । यापरि सर्वच देवासी अर्पुनी घरींदारी नांदें देवेशीं रया ॥९॥ भक्ति हे अखंड अधिकाराचे तोंड खंडोनि केले नवखंड । एकएका खंडे एक एक तरला बोलणें हे वितंड । अखंडतां जंव साधिली नाही तंव मुक्त म्हणणे हे पाषांड । बद्धता मुक्तता दोन्ही नाही ब्रह्मात्व नुरे ब्रह्मांड रया ॥१०॥ सहज स्वरुपस्थिती तया नांव भक्ति नवविधा भक्ति भासती । ऐसी भक्तिप्रति अंगें राबे मुक्ति दास्य करी अहोराती । दासीसी अनुसरणें हे तंव लाजिरवाणे मूर्ख ते मुक्ति मागती । एका जनार्दनी एकविधा भक्ति तै चारी मुक्ति मुक्ति होती रया ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग