वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

पात्र शुद्ध चित्त ग्

🙏 3. संत तुकाराम · ABH-077420 · अभंग क्र. २५८८

2588.
पात्र शुद्ध चित्त ग्वाही । न लगे काही सांगणे ॥१॥
शूर तरी सत्यचि व्हावे । साटी जीवे करूनि ॥धृपद॥
अमुपच सुखमान । स्वामी जन मानवे ॥२॥
तुका म्हणे जैसी वाणी । तैसे मनी परिपाक ॥३॥

अर्थ :
आपले चारित्र्य शुद्ध आहे किंवा नाही याविषयी आपले चित्त साक्षी असते याविषयी दुसऱ्याने किंवा दुसऱ्याला काही सांगण्याची गरज नाही. शुर व्हायचे असेल तर जीवावर उदार होऊन खरे शुर व्हा. त्याला भरपूर सुख प्राप्त होऊन राजा आणि प्रजा या दोन्हींमध्ये ही मान मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात आपली जसी वाणी असेल तसेच मनातही विचार असून त्या प्रमाणे जो वागतो तोच परिपाकी म्हणजे सर्वमान्य होतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग