वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 84. वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८

देव म्हणती मेसाबाई ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084567 · अभंग क्र. २५८६

2586.
देव म्हणती मेसाबाई । पूजा अर्चाकरिती पाही ॥१॥
नैवेद्य वहाती नारळ । अवघा करिती गोंधळ ॥२॥
बळेंचि मेंढरें बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ॥३॥
बळेंचि आणिताती अंगा । नाचताती शिमगी सोंगा ॥४॥
सकळ देवांचा हा देव । विसरती तया अहंभाव ॥५॥
एका जनार्दनी ऐसा देव । येथे कैसा आमुचा भाव ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग