वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

अमृत अव्हेरे उचंबळले

🙏 3. संत तुकाराम · ABH-077115 · अभंग क्र. २५६७

2567.
अमृत अव्हेरे उचंबळले आता । विष आर्त भूता आवश्यक ॥१॥
आदरासी मोल नये लावू केजे । धीर शुद्धबीजे गोमटा तो ॥धृपद॥
खऱ्याचिये अंगी आपणची चाली । लावणी लाविली काय लागे ॥२॥
तुका म्हणे चाडे करा वेंवसाव । आम्हासी तो वाव धीर आहे ॥३॥

अर्थ :
व्यसनाधीन मनुष्या जवळ अमृत असले तरी त्या अमृताचा अव्हेर तो करतो आणि गांज्या आफु या सारख्या विषाला जीवनावश्यक वस्तू समजतो. आपल्याला एखाद्याने आदराने काहीही दिले तरी त्याचे मोल होऊ शकत नाही जे कोणी सज्जन आहेत त्यांच्या पोटी सज्जन मुले जन्माला येतात आणि त्यांनाच व्यसनापासून दूर राहण्याचे धैर्य असते. जो मनुष्य खरा आहे त्याची वृत्ती देखील खऱ्याकडे वळते आणि जो खोटा आहे त्याच्या ठिकाणी कितीही खऱ्या वागण्याची लावणी केली तरी त्याला लागेल काय? तुकाराम महाराज म्हणतात हे जण हो तुम्ही कोणताही व्यवसाय करा तो व्यर्थच आहे असे आम्ही मानू पण आमच्यात तसेच धैर्‍याला वाव आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग