वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

स्वमुखेचि तुह्मी सां

🙏 3. संत तुकाराम · ABH-076990 · अभंग क्र. २६०४

2604.
स्वमुखेचि तुह्मी सांगा मज सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥
निघो आम्ही काही चित्तवित्त घरे । आपुल्या उदारे जीवावरी ॥धृपद॥
बोल परस्परे वाढवावे सुख । पाहावे श्रीमुख डोळेभरी ॥२॥
तुका म्हणे सत्य बोलतो वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥३॥

अर्थ :
देवा तुम्ही तुमच्या स्वमुखानेच मला तुमची सेवा कशी करावी हे सांगा असे माझे मनोरथ तुमच्याजवळ आहे. आम्ही आमचे चित्त वित्त घरदार सर्व तुला समर्पण केले आहे ते देखील आमच्या जीवावर उदार होऊन त्यामुळे आम्ही ते परत कधीही तुझ्याकडून घेणार नाही. देवा आपण दोघानी परस्परांशी बोलावे त्यामुळे माझे सुख वाढवावे आणि मी तुमचे श्रीमुख डोळे भरुन पाहावे एवढीच माझी इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्या चरणाला साक्ष धरुन जे काही बोलत ते सत्यवचन बोलत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग