आलो ऐकोनी खंडोबाची थ
2589.
आलो ऐकोनी खंडोबाची थोरी । वाघा होऊनि मज मागा म्हणती वारी ॥१॥
ठकलो ठकलों वाउगा सीण । वारी मागतां पोट न भरे जाण ॥२॥
सदा वागवी कोटंबा आणि झेंडा । रांडापोरे त्यजिलीं जालो काळतोंडा ॥३॥
गेले दोनी ठाव आता कोठे उरला वाव । एका जनार्दनी भेटवा मज पंढरीरावो ॥४॥
