जयाचेनि तुटे भवबंधन
2597.
जयाचेनि तुटे भवबंधन । तयासी जाण विसरती ॥१॥
करिती आणिकांची सेवा । ऐसे ते अभागी निर्दैवा ॥२॥
मुळींच नाही देवपण । तेथे करिती जप ध्यान ॥३॥
विसरूनि खर्या देवासी । भुलले आपुल्या मानसी ॥४॥
सत्य सत्य बुडती जनी । एका शरण जनार्दनी ॥५॥
