वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

पाहा हो देवा कैसे जन

🙏 3. संत तुकाराम · ABH-077404 · अभंग क्र. २५७२

2572.
पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचिते ॥१॥
एक नाही एका ऐसे । दावी कैसे शुद्ध हीन ॥धृपद॥
पंचभूते एकी राशी । सूत्रे कैसी खेळवी ॥२॥
तुका म्हणे जे जे जाती । त्याची स्थिति तैशी ते ॥३॥

अर्थ :
देवा पहा हे लोक आपल्या संचित कर्मानुसार भिन्न भिन्न देहामध्ये जन्माला आले आहे. देवा आहो हे एकसारखे नाहीत काही शुध्द आहेत, तर काही हीन आहेत, काही चांगले, तर काही वाईट आहेत याचा अर्थ असा की यांचे पूर्वकर्मच हे प्रकार दाखवत आहेत. सर्व देह एका पंचमहाभूतांपासून बनलेले आहेत परंतु सर्वांचे पूर्व संचित हे भिन्न भिन्न आहेत आणि ते कसे ओळखावे ते तुम्हीच सांगा? तुकाराम महाराज म्हणतात जो जन्म आणि कर्मानुसार ज्या जातीचा असतो त्याची स्थिती देखील तशीच असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग