नववा बैसे स्थिररूप ।
2560.
नववा बैसे स्थिररूप । तया नाम बौद्धरुप ॥१॥
संत तया दारी । तिष्ठताती निरंतरी ॥२॥
पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ॥३॥
शोभे चंद्रभागा तीर । गरुड हनुमंत समोर ॥४॥
ऐसा विठ्ठल मनी ध्याऊं । एका जनार्दनी त्याला पाहुं ॥५॥
