वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 79. कारण देह - अभंग २५६९

कारण देह - अभंग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086890 · अभंग क्र. २५६९

2569.
कारण देह - अभंग

आता कारण जे अज्ञान । तेंहीं गेले वोसरोन । बोधाचे आसन । बैसलें तेथे ॥१॥ कारण रुप सुषुप्ति । आनंद भासत हृदयी प्राप्ती । या समस्ताची वस्ती । वस्तु झाली ॥२॥ ऐसा असोन वोहोट झाला । ज्ञानरसें पै भरला । मग सर्वांठायीं देखिलां । आत्मबोध ॥३॥ एका जनार्दनी आत्म्याची भेटी । तेथे उडाली त्रिगुण । मग बोधासी राहटी । जेथे तेथे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग