कामक्रोध वैरीयांचे त
2466.
कामक्रोध वैरीयांचे तोडियेले फांसे । जनार्दने सरसे केले मज ॥१॥
देहाची वासना खंडुन टाकिली । भ्रांतीची उडाली मूळ दोरी ॥२॥
कल्पनेचा कंद समूळ उपडिला । हृदयी दाविला आरसा मज ॥३॥
एक जनार्दनी सहज आटले । स्वदेहीं भेटलें गुरुकृपें ॥४॥
