जेथे परापश्यन्तीची म
2478.
जेथे परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरु ॥१॥
तेणे माझे मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मी ॥२॥
उपाधी तुटली शांति हे भेटली । सर्व तेथे आटली तळमळ ॥३॥
एका जनार्दनी प्रेमाचें ते प्रेम । दाविले सप्रेम हृदयांत ॥४॥
