लौकिकापुरता नोहे हा
2492.
लौकिकापुरता नोहे हा विभाग । साधले अव्यंग सुखसार ॥१॥
अविट विटेना बैसलें वदनी । नाम संजीवनीं ध्यानीं मनी ॥२॥
बहुता काळांचें ठेवणें शिवाचें । सनकसनंदनाचेंक कुळदैवत ॥३॥
एका जनार्दनी भाग्य ते चांगलें । म्हणोनि मुखा आले रामनाम ॥४॥
