वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

माझिया जीवासी हेचि प

🙏 3. संत तुकाराम · ABH-078285 · अभंग क्र. २४७६

2476.
माझिया जीवासी हेचि पै विश्रांति । तुझे पाय चित्ती पांडुरंगा ॥१॥
भांडवल गाठी झालेसे पुरते । समाधान चित्ते मानियेले ॥धृपद॥
उदंड उच्चारे घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा ॥२॥
तुका म्हणे मज भक्तीची आवडी । अभेदी तांतडी नाही ह्मुण ॥३॥

अर्थ :
हे पांडुरंगा तुझे पाय माझ्या चित्तात सदैव असावे हीच माझ्या जीवाला विश्रांती आहे. देवा हेच भांडवल माझ्या कडे माझ्या पदरात भरपूर बांधले आहे त्यामुळे माझ्या चित्ताने समाधान मानले आहे. माझ्या वाणीने तुझ्या नामाचा उच्चार खूप केला असून त्याचा विस्तारही केला आहे व तुझ्या रूपावर माझ्या आवडीचा म्हणजे प्रेमाचा भर आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझ्या भक्तीची खूप आवड आहे त्यामुळे आपल्यातिल अभेद असाच राहून आपल्यातील भेद नष्ट व्हावा या विषयी अजिबात मला तातडी नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग