वेदाचा वेदार्थ शास्त
2493.
वेदाचा वेदार्थ शास्त्राचा शास्त्रार्थ । आमुचा परमार्थ वेगळाची ॥१॥
श्रुतीचें निजवाक्य पुराणींचे गुज । आमुचे आहे निज वेगळेंची ॥२॥
तत्त्वाचे परमतत्त्व महत्वासी आले । आमुचे सोनुले नंदाघरीं ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्माडांचा जीव । आमुचा वासुदेव विटेवरी ॥४॥
