जनार्दनं मज केला उपक
2464.
जनार्दनं मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा ॥१॥
प्रपंच पारखा जाहला दुराचारी । केलीसे बोहरी कामक्रोधा ॥२॥
आशा तृष्णा यांचे तोडियलें जाळें । कामनेचें काळे केले तोंड ॥३॥
एका जनार्दनी तोडियेले लिगाड । परमार्थ गोड दाखविला ॥४॥
