वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

जाणतो समये । परिमित

🙏 3. संत तुकाराम · ABH-078049 · अभंग क्र. २४८६

2486.
जाणतो समये । परिमित कामा नये ॥१॥
तुम्ही सांगावे ते बरे । देवा सकळ विचारे ॥धृपद॥
फुकाचिये पुसी । चिंता नाही होते ऐसी ॥२॥
तुका म्हणे आहे । धर पाय मज साहे ॥३॥

अर्थ :
देवा वेळप्रसंगी कसे वागावे हे तर मी जाणतो परंतु हे ज्ञान मला मुक्त करण्यासाठी कामी येणार नाही. देवा सर्व विचार करून योग्य काय आहे ते तुम्हीच मला सांगा व हेच चांगले आहे. अहो जर फुकट प्रश्न विचारून माझी चिंता नाहीशी होत असेल तर तो प्रश्न मी का बर विचारू नयेत? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या चरणावर सदैव पडून आहे त्यामुळे तुम्ही मला सहाय्य करावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग